पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑक्टोबरपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार आहे. त्यानंतर हळुहळू या सेवेचा विस्तार केला जाणार असल्याचे ‘रिलायन्स जिओ’कडून सांगण्यात आले आहे. देशातील खासगी टेलिकाॅम कंपन्या 5G सेवेची तयारी करीत असताना, सरकारी ‘बीएसएनएल’ आता कुठे 4G लाँच करीत आहे. सध्या ‘बीएसएनएल’ (BSNL) घरघर लागली असली, तरी आजही अन्य कंपन्यांच्या तुलनेत ‘बीएसएनएल’ची सेवा स्वस्त आहे. अशात एअरटेल (Airtel), जिओच्या (Jio) गोटात खळबळ उडविणारी बातमी येत आहे. वर्षभरात सुरु होणार.. पुढील काही दिवसांतच ‘बीएसएनएल’चीही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. खुद्द केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’च्या कार्यक्रमात ही घोषणा केली. गावाेगाव नेटवर्क असलेली ‘बीएसएनएल’ 5G सेवा 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.. विशेष म्हणजे, अजून 4G सेवाही सुरु झालेली नसताना, ‘बीएसएनएल’ वर्षभरात 5G सेवेचे लक्ष्य कसे गाठणार, या प्रश्नावर मंत्री वैष्णव म्हणाले, की 4G वरून 5G...
Welcome ,To My blog's Site...