Skip to main content

आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!!

आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!!
VIRALब्रेकिंग....
आधार कार्ड’.. प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक नि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा. बँकेत खाते सुरु करायचं असो, वा गॅस सिलिंडरचे अनुदान हवं असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची मागणी केली जातेच..

बऱ्याचदा आधार कार्ड तयार करताना, नजरचूकीने काहीतरी राहून जाते.. कधी नाव चुकतं, कधी जन्मतारीख, कधी पत्ता, तर कधी मोबाईल नंबर..! शक्यतो आधार कार्ड काढताना आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं.. अर्थात, नंतर ही चूक दुरुस्तही करता येत होती. अर्थात, त्यासाठीही काही मर्यादा घालून दिल्या होत्या..


मात्र, आता आधार कार्ड अपडेट करणं अवघड होणार आहे.. कारण, ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) कडून आधार कार्डशी संबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. त्याचा फटका सगळ्याच आधार कार्डधारकांना बसणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

आधार’बाबत कोणत्या सेवा बंद..?
 
पत्ता प्रमाणीकरण पत्र
‘युआयडीएआय’कडून ‘अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे. आपल्या वेबसाइटवरूनही ‘अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’शी संबंधित पर्याय काढून टाकला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पत्ता प्रमाणीकरण पत्राची सुविधा बंद केल्याचे ‘युआयडीएआय’कडून सांगण्यात आले.

‘युआयडीएआय’च्या या निर्णयामुळे लोकांना आधार कार्डमधील पत्ता अपडेट करण्यात अडचणी येणार आहेत. विशेषत: जे लोक भाड्याने राहतात किंवा सतत नोकरी बदलत असतात, त्यांना आता ‘आधार’वर पत्ता अपडेट करणे मुश्किल होऊ शकतं.. पत्त्याबाबत इतर कोणताही पुरावा नसणाऱ्यांची मोठी अडचण होणार आहे..
 
आधार कार्डचे प्रिंटिंग बंद
‘युआयडीएआय’चा दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे, जुन्या शैलीतील ‘आधार कार्ड’ रिप्रिंटची सेवा बंद करण्यात आली आहे. जुन्या कार्डाऐवजी ‘युआयडीएआय’कडून आता प्लास्टिक ‘पीव्हीसी’ आधार कार्ड जारी केलं जातं. हे कार्ड सोबत बाळगणंही सोपं आहे.. खिशात आणि वॉलेटमध्ये ते सहज ठेवता येते..

आधार मदत केंद्राने याबाबत एक ट्विट केलंय.. त्यात म्हटलंय की ऑर्डर आधार पुनर्मुद्रण सेवा बंद केली आहे. त्याऐवजी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता.. ई-आधारची प्रिंट आउटही काढू शकता. ते कागदाच्या स्वरूपात ठेवू शकता.


Comments

Popular posts from this blog

The Secret Book - Rhonda Byrne | Summary in Hindi | द रहस्य बुक हिंदी समरी.

The Secret Book Summary in Hindi: आज दुनिया में सब कोई दुखी है पर इस दुखी जीवन में हमें खुश रहना है। लेकिन इस दुख भरी जीवन में खुश रहना असंभव है। दुख और सुख जीवन के दो पहलू हैं। दुख होगा तो सुख आएगा और सुख होगा तो दुख आएगा। जैसे दिन होती है तो रात अवश्य होगी, रात होती तो दिन होना तय है। वैसे ही हमारे जीवन में कई सारी कठिनाइयों का सामना करना पड़ता है। परंतु कठिनाइयों को सामना करने के उपरांत एक ऐसा जीवन, एक ऐसा क्षण आता है जो हमारे जीवन में जो खुशी ला देता है।   हमें हमेशा खुश रहना चाहिए अर्थात हमें हमेशा पॉजिटिव रहना चाहिए। हमारे बड़े बुजुर्ग भी कहते थे कि हमेशा खुश रहो और मस्त रहो। ऐसे कई मोटिवेशनल स्पीकर भी हैं व ट्रेनर भी है, जो हमारे जीवन में दुखों को बुलाकर खुशी लाने का प्रयास करते हैं और हमें पॉजिटिव एनर्जी मिल जाती हैं। यदि हम जीवन में खुश रहते है तो हम अच्छे से अच्छे मुकाम को हासिल कर पाते हैं। ऐसे ही आज हम एक किताब के बारे में बात करने जा रहे हैं, जिसे पढ़कर आपको पॉजिटिव एनर्जी मिलेगी और आप उस मुकाम को हासिल कर पाएंगे, जो आप इच्छा करते हैं।   The Secret Boo...

BSNL 5G Service Release date

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑक्टोबरपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार आहे. त्यानंतर हळुहळू या सेवेचा विस्तार केला जाणार असल्याचे ‘रिलायन्स जिओ’कडून सांगण्यात आले आहे. देशातील खासगी टेलिकाॅम कंपन्या 5G सेवेची तयारी करीत असताना, सरकारी ‘बीएसएनएल’ आता कुठे 4G लाँच करीत आहे. सध्या ‘बीएसएनएल’ (BSNL) घरघर लागली असली, तरी आजही अन्य कंपन्यांच्या तुलनेत ‘बीएसएनएल’ची सेवा स्वस्त आहे. अशात एअरटेल (Airtel), जिओच्या (Jio) गोटात खळबळ उडविणारी बातमी येत आहे. वर्षभरात सुरु होणार.. पुढील काही दिवसांतच ‘बीएसएनएल’चीही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. खुद्द केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’च्या कार्यक्रमात ही घोषणा केली. गावाेगाव नेटवर्क असलेली ‘बीएसएनएल’ 5G सेवा 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.. विशेष म्हणजे, अजून 4G सेवाही सुरु झालेली नसताना, ‘बीएसएनएल’ वर्षभरात 5G सेवेचे लक्ष्य कसे गाठणार, या प्रश्नावर मंत्री वैष्णव म्हणाले, की 4G वरून 5G...

Chatrapati Shivaji Maharaj Raigad Ford in Maharashtra.

 Raigad Fort : Raigad is a hill fort situated at about 25 Km from Mahad in the Raigad district. Chhatrapati Shivaji renovated this fort and made it his capital in 1674 AD. The rope-way facility is available at Raigad Fort, to reach at the fort from ground in few minutes. The fort also overlooks an artificial lake known as the ‘Ganga Sagar Lake’. The only main pathway to the fort passes through the “Maha Darwaja” (Huge Door). The King’s durbar inside the Raigad Fort has a replica of the original throne that faces the main doorway called the Nagarkhana Darwaja. This enclosure had been acoustically designed to aid hearing from the doorway to the throne. The fort has a famous bastion called “Hirakani Buruj” (Hirkani Bastion) constructed over a huge steep cliff. Forts in Raigad District